include_once("common_lab_header.php");
Excerpt for गाज by , available in its entirety at Smashwords


प्रकाशक

वर्जिन साहित्यपीठ
78, अजय पार्क, गली नंबर 7, नया बाजार,
नजफगढ़, नयी दिल्ली 110043

सर्वाधिकार सुरक्षित
प्रथम संस्करण - अप्रैल 2018
ISBN
कॉपीराइट © 2018
वर्जिन साहित्यपीठ


कॉपीराइट
इस प्रकाशन में दी गई सामग्री कॉपीराइट के अधीन है। इस प्रकाशन के किसी भी भाग का, किसी भी रूप में, किसी भी माध्यम से - कागज या इलेक्ट्रॉनिक - पुनरुत्पादन, संग्रहण या वितरण तब तक नहीं किया जा सकता, जब तक वर्जिन साहित्यपीठ द्वारा अधिकृत नहीं किया जाता।

गाज
(काव्य संग्रह)


कवयित्री
वृषाली गोटखिंडीकर
वृषाली गोटखिंडीकर

शाखा प्रबंधक
बँक ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर

jayvrishali@gmail.com


नदी ..


युगानुयुगे वाहत असतेस तु
दोन्ही किनार्याना धरून
कीती स्थित्यंतरे झाली जगात त्या साऱ्यांना सोबत घेऊन
अनेक ऋतु आले आणी गेले
तुझ्या प्रवाहात बदल नाही झाले
आयुष्ये बदलत असतात काठावरच्या माणसांची
तुला काहीच खबर नसते जणु कशाची आणी कुणाची .
तुला पाहतात कुणी देव मुर्तीच्या रूपात
आणी पुजतात मंदिराच्या गाभार्यात
आला जरी कंटाळा कधी थांबायची “मुभा” नाही तुला
कधी वाटले जर असे तुझ्या मनाला
तर “आमंत्रण “च असेल ते तुझ्या मृत्यूला !
विचार करते ना जेव्हा मी तुझ्या मनाचा
खरेच ठाव च लागत नाही ग तुझ्या प्रवाहाच्या तळाचा
नवल वाट्ते पाहुन तुझे” उदंड “वाहाणे
तुझ्या अस्तित्वाने तर “सुसह्य “होत असते माणसाचे जगणे!!


शहर


शहर पुर्वी जागे व्हायचे
झुंजुमुंजू “च्या सुवासाने”
देवळातल्या घंटेच्या नादाने
सुवासिनींच्या सडा रांगोळीने
आणी देवळातल्या पुजार्याच्या लगबगीने
दिवस भर मग चालु राहत असे
थोडीशी धावपळ चाकरमान्यांची
शहर तेव्हा लवकर उठायचे
आणी झोपायचे सुध्धा लवकर
मग ठरवले शहरातल्या लोकांनी
शहराला “मोठ्ठे” करायचे
जगाच्या नकाशा वर त्याला आणुन ठेवायचे
आणी मग शहराची “भरभराट” चालु झाली
ऑफिसे, कारखाने, गिरण्या यात काम करण्या साठी
माणसांची “गर्दी” शहरात लोटली
माणसाना जणु “झिंग” चढली शहराला वाढवायची
शहराला मात्र काय वाटतेय
कुणालाच पर्वा नव्हती त्याची
आता शहराचे “वाढणे” इतके वाढले की ..
शहराला “सुज” येऊ लागली .
माणसांच्या गर्दीत
रेल्वेच्या जंजाळात
कारखान्यांच्या चक्रव्यूहात
त्याची दमछाक होऊ लागली
आता शहर झोपतच नाही
मग जागे तरी कसे होणार ते?
पहाटेपासून रेल्वेच्या कर्कश्श शिट्ट्यात
दुध, पेपर,आणि डबेवाल्यांच्या कलकलाटात
सीमेच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या जंगलात
त्याचा जीव घुसमटतो आहे
काळ्या” धंद्याच्या काळ्या हातांनी
त्याला आपल्या मगर मिठीत घेतलेय
शहर “धापा” टाकतेय आता
त्याचा “जीव” जीवात नाहीये
माणसे मात्र धावतायत आपल्याच तालात
त्याना शहराशी काहीच देण घेण नाहीये !!

जगरहाटी


जगात राहायचे तर जगरहाटी प्रमाणे वागायचे
लहानपणापासून हेच आपण ऐकत असायचे
पण काय आहे ही जगरहाटी.
कळणार कसे ?
कळलेच नाही तर आपण वागणार तरी कसे ?
कधी उपयोगी पडावे दुसऱ्याला
काम होताच मात्र तो ढकलून देतो आपल्याला
कधी आपल्या संकट काळी मदती साठी पहावे दुसऱ्याकडे
तो निर्विकार राहून बोट मात्र दाखवतो तिसऱ्याकडे
परोपकार आपुलकी निर्व्याज प्रेम ..
यांनी जागा सोडलीय आपली ..
स्वार्थ कृतघ्न पणा दुष्प्रवृत्ती यांनी त्यांची जागा पकडली
अनुभव आपला दुसऱ्याला “कवडीमोल “भासतो
काही सांगु गेले” प्रेमाने” तर फुकटचा सल्ला वाटतो
आपल्याच माणसासाठी आपले मन कायम तुटत असते
त्यांना मात्र आपल्या भावनाचे काहीच सोयर सुतक नसते
तरीही रहाट गाडग्या प्रमाणे
अशीच जगरहाटी चालत असते
माणसाला चालायला जमले नाही तर त्याला आपल्या बरोबर
ओढत असते ...!!पाणी ...पाणी


...कुणाच्या ."डोळ्यात" पाणी
तर कुणाचे डोळेच "पाणीदार"
कुणाच्या "अंगात पाणी "
तर कुणाचा साफ "स्वभाव" जणू काही "पाणी "!
कुणी .लाथ मारेल तिथे काढते "पाणी"
तर कुणाच्या काळजाचे होत असते "पाणी .पाणी "!
कुणी पैसे उडवते "पाण्यासारखे".!!!
तर कुणाचे मनच "निर्मळ "पाण्यासारखे "!
कुणी पाण्याच्या "थेंबा..थेंबा" साठी भटकत असते गावभर..
तर कुणी पाण्यातच "डुंबत" असते दिवसभर ...!!
कुणी इमानदारीने आयुष्य, घडवत असत करून.आपल्या रक्ता च पाणी .
तर कुणाच्या रक्तातच असत "बेईमानीचे पाणी "!!!
असे ..म्हणतात"पाणी म्हणजे" जीवन "
हे पाणीच नसेल तर काय असेल" जीवन "?तीचे अस्तित्व


..तसे फार नाही जुने नाते तुझे माझे
गुंतले होते तेव्हापासूनच श्वास तुझे माझे ..
तुला माहीत नव्हते तेव्हा ..आहे मी कोण
फक्त लागली होती मी येणार याची कुणकुण !
मग आग्रह झाला तुला तपासणीचा ..
आणी लागला पत्ता तुला मी मुलगी असल्याचा !!
जणू पायाखालची जमीन सरकली वाटले तुझ्या मनात
काय होईल .तेव्हा जेव्हा कळेल हे सारे जनात !!
मग घ्यावा लागला निर्णय मला संपवून टाकण्याचा
विचार सुध्दा केला नाहीस तेव्हा माझ्या मनाचा ..
अजून आले नाही जगात ..पण आहे ग मी “सजीव “
माझ्या पण इवल्याशा शरीरात आहे ग धगधगता जीव ..
आई आई ग ..मी तुझी लाडकी कळी
नको ना करू मला तुझ्या पासून वेगळी ...!!!

पिंजरा


तुला सांगू का बये ..
या पिंजर्यात आपली समदी दुनिया हाये ..
या पिंजऱ्याला सोडून जाण.
कुणाच्याच हातात न्हाय ..
ह्यो पिंजरा सोडून भायेर जाशील .
तर लयी पस्तावशील .
भायेरचे “डोमकावळे”..
तुला टोचून टोचून मारतील ..
कवा इच्यार करशील ना ह्यो पिंजरा सोडण्याचा
तवा इच्यार कर बये आपल्या “मरणाचा !!
लेक


तिच्या घरातली तिची लाडकी “लेक
आहे घरात “एकुलती एक ..
माहेरात होती तशीच राहावी सुखात
नांदावी “आनंदात
म्हणून “घर “दिले पाहून ..
धान्य धुन्य भरलेले
कपड्या लत्त्यानी “भरलेले ..
पैश्या अडकयानी “भरलेले ..
पण कुठे काय बिनसले कोण जाणे .
तिच्या लेकीचे डोळेच असतात सदा “भरलेले ..!!!

खोटे आणि खोटे


का बोलतात लोक” खोटे” हे कधीच उमगत नसते
कदाचित खोटे बोलू नये हे त्यांना कळत असते पण” वळत “नसते .
छोट्या छोट्या गोष्टीत गोष्टीत पण माणसे खोटे बोलत असतात
सफाईदार पणे खऱ्या गोष्टीला “खोटे च ठरवत असतात !
खऱ्या खोट्याची “सरमिसळ बेमालूम करत असतात
असे लोक पावलो पावली आपल्याला भेटत असतात !!
खरे कोणते “खोटे कोणते हेच कधी कधी उमगत नसते
गांधारी “सारखे डोळ्यावर पट्टी बांधून इथेच आपल्याला वावरायचे असते !
खोट्याच्या कपाळी गोटा असतो असे उगाचच म्हणत असतात
वास्तवात मात्र “खऱ्या “लाच सारे टाळत असतात ..
खर्याची काय दुनिया नाही “.असे खोटे लोक पण बिनदिक्कत म्हणतात
काय माहीत त्यांच्या मनात तेव्हा काय “विचार ‘असतात
या खोट्या “दुनियेत राहून ही काही लोकांनी स्वताला खरे ठेवलेले असते
मनाची “खोटी “समजूत काढून स्वताचे “स्वत्व जपलेले असते
अशा या “खोट्या “दुनियेत मात्र खरा माणूस रहात असतो .
खोटे बोलायसाठी पण खऱ्या माणसात राहण्या व्यतिरिक्त त्याच्या कडे” पर्याय” नसतो !!


क्षुल्लक


ठेच लागता लागता .
तो दाखवून देतो तुझ्या झालेल्या चुका
आणी त्या चुकातून च तो शिकवत असतो
अमुल्य धडे..आयुष्यातले
म्हणुन काय झाले
तो तर आहे एक “क्षुल्लक “दगड !
कीती तरी मैल प्रवास चालु असतो तुझा
आता कीती राहिला पल्ला
आणी कीती राहिले अंतर
हे तोच तर सांगत असतो उभा राहून
मैला मैला च्या अंतरावर
म्हणुन काय झाले
तो तर आहे एक “क्षुल्लक “दगड !
घर उभे राहते तुझे
सुंदर अगदी तुझ्या “मनासारखे “
बळकट भिंती आकर्षक दरवाजे खिडक्या
माहीत आहे ना तुला
याच्या पाया वरच आहे उभा तुझा “डोलारा “
म्हणुन काय झाले
तो तर आहे एक “क्षुल्लक “दगड !
प्रत्येक गोष्टीला असे क्षुल्लक मानणाऱ्या माणसा
तसे पाहायला गेले तर तुही आहेस्
एक क्षुल्लक जीव जंतू ..या विश्वाच्या पसार्यात
आणी शेवटी तुझी पण होणार आहे
क्षुल्लक “चीमुटभर माती
मातीतच मिसळून जाणारी !!!!

ती


तुम्ही जन्माला येता तेव्हा तुमच्या बरोबर च येते ती
तुमच्या भाळावर स्वताला “वागवते “ती
तिची तुमची गाठ मग पक्की असते आयुष्यभर
तुमच्या कोणत्याही चुकीचे तिच्याच माथ्यावर फुटत असते खापर !
साध्या साध्या गोष्टीत पण तुम्ही तिलाच “बोल” लावत असता
गाठी भेटी झाल्या नाहीत एकमेकांच्या
तरी तिलाच दोष देत असता
तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक वाईटाची धनी तीच असते
चांगले काही घडले तर मात्र कुणाच्याच मुखी तीचे नाव नसते
अशी असते कायमच तुमच्या सोबती
कोणी काही म्हणोत ती तर असते तुमची “नियती”!!नियती


तसे आकाश साऱ्यांचे सारखेच असते
पण काही काहींच्या च डोळ्यात मावतो
ताटलीभर चंद्र आणी आभाळभर चांदण्या
प्रत्येकालाच हवा असतो
एक जमिनीचा लहानसा तुकडा
पण काहींच्याच नशिबात असते
आकाशाला गवसणी घालणारी धरती
रोंरावत असतो समुद्र दिवसभर
सर्वांच्याच कानात ..
पण काहीना च ऐकु येत असते
त्याच्या हृदयीची “गाज” .
प्रत्येक जण शोधत असतो
काहीतरी “...आयुष्यभर
कुणाला ते मिळणार आणी
कोण “वंचित “राहणार ..
हे तर अवलंबुन त्या “नियती “वर !!!दगड


त्या उजाड माळराना वर तु होतास
कित्येक वर्षे खितपत पडलेला
आजुबाजुला वाळू मातीचे डोंगर
आणी त्यात च तु “लपलेला “
उन पाऊस धूळ मातीची पुटे तुझ्यावर
चढत होती धुतली जात होती
तुझ्या आजूबाजूच्या परिसरात
तुझी कुणाला “दखल “च नव्हती
नंतर मात्र सारा बदल अचानक घडला
बांधकामासाठी साफसफाई करताना सर्वाना तुझा पत्ता लागला
सर्वांनाच आवडले तुझे सुंदर “घडीवपण “
मग तुला मिळाले तुझे स्वतंत्र ठिकाण .
तु पण आनंदुन गेलास स्वतच्या झळाळी ला पाहुन
दिवस पालटले आपले म्हणुन मनोमन गेलास हरखून !!!
नंतर अनेक दिवस सरले पण काहीच नाही घडले
बांधकामाची योजना, तयारी सारे सारे काही बारगळले
तुझ्या आनंदाला जणू गालबोट लागले
दारूच्या बाटल्या आणी कुत्र्या मांजरांची विष्ठा
पार धुळीला मिळवली त्यांनी तुझी प्रतिष्ठा
नशिबा वर हळहळून पण फार काही उपयोग नव्हता
तुझा “शांतपणा “हाच त्यावर उपाय होता
काही दिवस असेच गेले आणी परत तुझे दिवस बदलले
कुणा भक्ताला तुझ्यात देवाचे रूप दिसले
शेंदूर फासला त्याने तुला आणी रुपडेच बदलले तुझे
येणार्या जाणाऱ्या प्रत्येकाला “देवत्व “जाणवले तुझे
हळदी कुंकू आणी फुलांनी पुजन केले तुझे
नशीब पालटले तुझे आणी दुखः ही आता संपलेय
तुझ्या भोवताली आता म्हणे “देऊळ” बांधायला काढलेय ..


Purchase this book or download sample versions for your ebook reader.
(Pages 1-10 show above.)